मुंबई : पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन या कम्पनीने तयार केलेल्या CoviSelf या कोरोना चचणीच्या कीटला आयसीएमआरने कोरोना रॅपीड अँटीजन टेस्टला परवानगी दिली आहे. यामुळे आता घरच्या घरी कोरोना चाचणी करायला मदत मिळणार आहे.ही टेस्ट किट पुढील एक आठवड्यात बाजारात उपलब्ध होणार आहे.
टेस्ट कसे करायचा यासंदर्भातील व्हिडिओ माय लॅबने ट्विटरवर शेयर केली आहे. कोरोनाची लक्षणे आणि कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांना घरीच नाकातून स्टॅबचा नमुना घेऊन टेस्ट करता येणार आहे. टेस्ट कार्डवर दोन सेक्शन असतील. एक कंट्रोल, तर दुसरा टेस्ट सेक्शन. जर बार केवळ कंट्रोल सेक्शन ‘C’वर असेल, तर कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आहे. जर बार कंट्रोल सेक्शन ‘C’ आणि सेक्शन ‘T’ या दोन्हीवर असेल, तर अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह आहे.
पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन लिमिटेड कंपनीने घरच्या घरी रॅपिड अँटिजन टेस्ट किट तयार केलं आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणं दिसत आहेत किंवा ज्या व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आली आहेत, त्यांनीच या किटचा वापर करावा, असा सल्ला या कंपनीने दिला आहे.