ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पुण्यतिथीचे कार्यक्रम रद्द करून गरिबांना केले अन्नदान, अक्कलकोटच्या शरण मठाचा उपक्रम

अक्कलकोट, दि.२३ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट संस्थानचे राजगुरु श्री रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजींच्या ७१ व्या पुण्यतीथी निमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करून गरिबांना महाप्रसाद वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.या कामासाठी रॉबिन हूड आर्मीचे मोठे सहकार्य मिळाले.दरवर्षी शरण मठ अक्कलकोट येथे महास्वामींच्या पुण्य तिथीला भव्य कार्यक्रम होत असतात.परंतु सध्या निर्बंध कडक असल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

कोरोना संसर्गजन्य रोगामुळे प्रशासनाने सर्व धार्मिक, सामाजिक कार्यक्रमावर घेतलेल्या निर्बंधामुळे पुण्यतिथी महोत्सवात होणारे प्रवचन, पारायाण, शिवनमो सप्ताह, सामुदायिक विवाह, पालखी मिरवणूक, रथात्सव, कैलास मंडप पूजा व भस्म पूजा यासारखे होणारे यावर्षीचे धार्मिक व सामाजिक कार्यक्रम रद्द करण्यात आले.

शरण मठाचे मठाधिश श्री सद्गुरु चिक्करेवणसिध्द शिवशरण महास्वामीजींच्या हस्ते नैमितिक पुजा करुन अक्कलकोट येथील सामाजिक संस्था
रॉबीन हुड आर्मी यांच्यामार्फत गरजू व बेघर लोकांचे महाप्रसाद बनवून वितरण करण्यास देण्यात आले.

रॉबीन हुड आर्मिचे कार्य अतिशय चांगले व महत्वपूर्ण आहे, असे स्वामीजीनी यावेळी सांगितले. तसेच रॉबिनहूड आर्मीला पुढील कार्यास आशीर्वाद दिले.यावेळी मठाचे चेअरमन माणिक निलगार ,सेक्रेटरी घाळेप्पा निरोळी,चौडप्पा भैरामडगी,बसवराज आळंद,नागु हूलमनी,नागु मुंडोडगी,महादेव जुळ जुळे,परमेश्वर कंचे व बसवराज देगील इतर सदस्य उपस्थित होते.

यावेळी रॉबिनहूड आर्मी अक्कलकोटचे अध्यक्ष रशिद खिस्तके, समीर शेख, सोहेल फरास, सरफराज कमानघर, बरगली घोडके आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!