रुग्णवाहिकांसाठी दरपत्रक निश्चित
सोलापूर,दि.3: जिल्हा प्रशासनाने रुग्णवाहिकेचे दरपत्रक निश्चित केले आहे हे दर सोलापूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि अकलूज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात लागू राहील,असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
त्यांनी या पत्रकात नमूद केले आहे की, निश्चित केलेले दर रुग्णवाहिकांच्या दर्शनी अथवा आतील भागात चिकटवण्यात यावेत. निश्चित दरापेक्षा जास्त भाडे आकारल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल. दरपत्रकात वाहनाचे इंधन आणि चालकाचे वेतन मिळून दरपत्रक ठरविण्यात आले आहे. रुग्णवाहिकेस जीपीएस प्रणाली आवश्यक आहे. प्रत्येक फेरीनंतर रुग्णवाहिका निर्जंतुकीकरण करायचे आहे. रुग्णवाहिकांना मोटार वाहन कायदा आणि त्यातील तरतुदीनुसार लागू होणारे नियम आणि अटी लागू राहतील.
रुग्णवाहिकासाठी निश्चित करण्यात आलेले दरपत्रक :
अ.क्र.
● रुग्णवाहिका प्रकार
दर 25 कि.मी. अथवा दोन तासापर्यंत
25 किमी नंतर दर प्रति किमीसाठी
● दोन तासानंतर प्रत्यक्ष तास
शासकीय कामाकरीता वाहन अधिग्रहण केल्यास /इंधन विरहीत दर 24 तासासाठी
1. मारुती ओमनी
500/-
11/-
50/-
1800/-
2. टाटा/सुमो /विंगर/मेटॅडोर
600/-
12/-
75/-
2000/-
3. टाटा 407/फोर्स ट्रॅव्हलर/स्वराज माझदा
900/-
13/-
100/-
2300/-
4. सर्व प्रकारच्या उत्पादकांचे अद्यावत वाहने (ॲडव्हॉन्स्ड लाईफ सपोर्ट सिस्टिम)
1000/-
15/-
100/-
2500/-