ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सरसंघचालक मोहन भागवत आणि इतर नेत्यांच्या अकाऊंटवरील ब्ल्यूटीक हटवलं

दिल्ली : ट्विटर आणि भाजपमधील वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याला कारणही तसेच आहेत. ट्विटरकडून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, सुरेश सोनी, भय्याजी जोशी आणि अरुणकुमार यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ‘ब्लू टिक’हटवण्यात आली होती.

 

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अकाऊंटवरील ब्लू टिक हटवण्यात आल्याने सरकार, तसेच भाजपकडून नाराजी व्यक्त केली होती. सरकारच्या नाराजीनंतर ट्विटरने आपली चूक मान्य केली आणि उपराष्ट्रपतींच्या अकाउंटला पुन्हा ‘ब्लू टिक’ दिली आहे.

आमच्या व्हेरिफिकेशन धोरणानुसार अकाऊंट सक्रिय नसल्यास ब्ल्यूटिक आणि व्हेरीफाईड स्टेटस हटविले जाऊ शकते, मात्र आता ब्ल्यू टिक आता परत देण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण ट्विटरच्या प्रवक्त्याकडून देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!