मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना आनंदी बातमी भारतीय हवामान खात्याने दिली आहे. मान्सून आपल्या निर्धारित वेळेपेक्षा दोन दिवस आधीच रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे येथे दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
हर्णे येथून पुढे त्याचा प्रवास सुरू होईल आणि पुढील काही दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात व्यापून जाईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केली आहे. राज्यात सद्या मान्सुनच्या वाटचालीस अनुकूल वातावरण निर्माण झाली अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
मान्सून गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, दक्षिण कोकणसह महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरील काही जिल्ह्यात दाखल झाला आहे.