पंजाब / चंदीगड : भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांच कोरोणामुळे निधन झालं आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर गेल्या ३० दिवसांपासून चंदीगडमधील पीजीआयएमईआर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता वयाच्या ९१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी १९५८ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवील होतं. गेल्याच आठवड्यात मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मला कौर सिंग यांचे निधन झालं होतं.
मिल्खा सिंग यांच्या जाण्यामुळे संपूर्ण क्रीडाविश्वात आणि देशात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नेत्यांनी ट्विटरद्वारे शोक व्यक्त करत मिल्खा सिंग यांना आदरांजली वाहिली आहे.
“श्री मिल्खा सिंग यांच्या निधनामुळे आपण एक महान क्रीडापटू गमावला आहे. असंख्य चाहत्यांच्या मनात त्यांच्यासाठी खास स्थान होतं. त्यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वानं अनेकांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्या निधनानं मोठं दु:ख झालं,” असं ट्वीट पंतप्रधानांनी केलं आहे.
In the passing away of Shri Milkha Singh Ji, we have lost a colossal sportsperson, who captured the nation’s imagination and had a special place in the hearts of countless Indians. His inspiring personality endeared himself to millions. Anguished by his passing away. pic.twitter.com/h99RNbXI28
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2021
काही दिवसांपूर्वी मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचे करोनामुळे निधन झाले होते. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निर्मल सिंह या पंजाब सरकारमध्ये खेल मार्गदर्शक आणि भारतीय महिला राष्ट्रीय व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार होत्या.
Saddened to learn about the demise of legendary athlete, the 'Flying Sikh', Milkha Singh. He created multiple records with his speed and spirit and won laurels for our country. His name will be inscribed in gold in sports history. My heartfelt condolences to his grieving family.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 19, 2021