ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भाजपवर जोरदार टीका

उस्मानाबाद : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही सीबीआय चौकशी करावी, असा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत मांडण्यात आला आणि तो मंजूरही करण्यात आला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवार जोरदार टीका केली आहे. एका गंभीर प्रकरणात अटक झालेल्या अधिकाऱ्याने पत्र लिहायचं आणि वाटेल तसे बेछूट आरोप करायचे हे चुकीचे आहे. गंभीर प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यावर भाजप अशाप्रकारचा ठराव घेत असेल तर यात भाजपची वैचारिक दिवाळखोरीच समोर आल्याचा पलटवार जयंत पाटील यांनी केली आहे.

ज्या व्यक्तीवर गंभीर आरोप आहेत, ज्याचा तपास एनआयए करत आहे, अशा अधिकाऱ्याने लिहिलेली पत्रं ही दबावापोटी लिहून घेतलेली आहेत की अशीच लिहिलेली आहेत, हे समजण्याइतकी महाराष्ट्राची जनता दुधखुळी नसल्याचे जयंत पाटील यांनी म्हंटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!