ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या कोरोना काळातील कामाचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’ ने केला सन्मान

अहमदनगर : पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचा डंका सातासमुद्रापार गेला आहे. त्यांच्या या कामाचं कौतुक ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’कडून करण्यात आला आहे. याबाबत निलेश लंके यांनी आपल्या ट्विटरवरून माहिती दिली आहे. अशा प्रकारे सन्मान होणारे निलेश लंके हे महाराष्ट्रातील पहिले आमदार ठरले आहेत.

कोरोना महामारीने मागील दोन महिन्यांमागे हैदोस घातला होता. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत होती. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला होता. वाढत्या संख्येमुळे बेड आणि ऑक्सिजनची कमतरता भासत होती. त्यावेळी अनेक रूग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून अनेकांनी आपला प्राण गमवला. यादरम्यान पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी खऱ्या अर्थाने जनतेचे नेतृत्त्व करत आपल्या लोकांसाठी कोरोना सेंटर उभारत आधार दिला.

त्यांनी भावळणी इथं तब्बल 1 हजार 100 बेडचं कोविड सेंटर सुरु केलं. कोविड सेंटर उभारलं नाही तर निलेश लंके कोरोना रुग्णांवरील औषधोपचार, त्यांचा आहार आदी गोष्टींकडेही स्वत: वैयक्तिक डॉक्टरप्रमाणे लक्ष देत होते.

दरम्यान, कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल आज मला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला हा सन्मान भेटला ही खुप मोठी गोष्ट आहे. हे सगळं माझ्यावर प्रेम करणाऱ्या मायबाप जनतेमुळे आणि सहकारी यांच्यामुळे शक्य झाल्याचं निलेश लंके म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!