अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील गोगांव ग्रामपंचायत येथे निधी मंजूर होताच अनेक कामाला सुरूवात करण्यात आली आहे. सध्या गोगांव ग्रामपंचायतवतीने जिल्हा परिषद माध्यमातून जलसंधारण नाला खोलीकरण कामासाठी निधी मंजूर झाल्याने हे काम प्रगतीपथावर आहे. त्याठिकाणी नाला खोलीकरणाचे काम सुरु आहे. यामुळे गावच्या परिसरातील शेतकऱ्यांना यांचा फायदा होणार आहे.
नाला खोलीकरण कामासाठी सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रदिप जगताप, सरपंच वनिता मधुकर सुरवसे, उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांनी आमदार
सचिन कल्याणशेट्टी व जिल्हा परिषदकडे पाठपुरावा केला होता. गावच्या विकासासाठी विविध विभागाकडून निधी मंजुर झाला असून कलेश्वर मंदिरातील विविध कामे अंतिम टप्प्यात आहेत. उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेले मागासवर्गीय दफन भुमी शेडचे काम ही लवकरच सुरु करण्यात येणार आहे. स्मार्ट गोगांव बनविण्यासाठी मी अहोरात्र काम करणार असल्याचे सरपंच वनिता सुरवसे यांनी सांगितले.