मुंबई : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी बोर्डाचा निकाल अधिकृत वेबसाईट mahresult.in वर जाहीर केला जाईल. दहावीचा निकाल नववी आणि दहावीच्या घेण्यात आलेल्या परीक्षांवर आधारित असेल. तर जे विद्यार्थी आपल्या गुणांबाबतीत समाधानी नाहीत ते विद्यार्थी नंतर परीक्षा देऊ शकतात असं राज्याचे शिक्षण मंत्री प्राचार्य वर्षा गायकवाड यांनी यापूर्वीच सांगितले आहे.
महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल 31 जुलै 2021 पर्यंत जाहीर करण्यात येईल. शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्यानुसार यावर्षी राज्यातील बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास केला जाईल आणि त्यांच्या गुणांचे अंतर्गत मूल्यांकनानुसार गुण दिले जातील. तसंच मूल्यांकन निकष देखील लवकर जाहीर केले जातील, असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.