अक्कलकोट : सोलापूर जिल्ह्यात बुधवारपासून विविध मागण्यांसाठी तलाठी यांचे बेमुदत रजा आंदोलन सुरू झाले आहे. यामुळे ग्रामीण भागातील महसूल मधील यंत्रणा विस्कळीत झाली असून शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. खरीप पेरण्या झालेल्या आहेत अशातच प्रशासनाकडून पिक विमा भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर हे आंदोलन सुरू असल्याने शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे.या आंदोलनात तलाठी संवर्गातील ८६ मंडल अधिकारी कारकून आणि जिल्ह्यातील ५६४ तलाठी यात सहभागी झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तलाठी संघटनेच्या वतीने निवासी नायब तहसिलदार बनसोडे निवेदन देण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष राजकुमार पांडेकर, जिल्हा सरचिटणीस विजापूरे, अक्कलकोट तलाठी अध्यक्ष एस. पी पाटील, सरचिटणीस आर. एस भासगी, उपाध्यक्ष एस. बी काळे, कार्याध्यक्ष एन.के मुजावर, तलाठी पवार, चव्हाण, फडतरे, अतार, हिरेमठ, थोरात, घंटे, पांढरे, नायकोडे, शिंदे, जगताप,राठोड, जमदाडे, जाधव, तेरदाळ, महिला तलाठी साळुंखे, भगत, शेख, सोरटे, मंडळ अधिकारी इंगोले, जमादार व सर्व तलाठी व तलाठी संवंगा्तील मंडळअधिकारी यावेळी उपस्थित होते.