मुंबई, दि.१३ : महाराष्ट्रातील डिजिटल मिडियात कार्यरत ज्येष्ठ पत्रकार, गावोगावी सक्रीय यू ट्यूब चॅनल्स्, वेब न्यूज पोर्टल्स् आणि डिजिटल मिडियातील सर्व संपादक, पत्रकार, वार्ताहर, फोटो व व्हिडिओ पत्रकार, टेक्निशियन्स् म्हणून क्रियाशील असलेले सर्वच पत्रकारबांधव ऑनलाईन माध्यमांना लोकमान्यता मिळण्यासाठी धडपडत असतात. अशा असंघटित डिजिटल प्रसार माध्यमांना संघटित करण्याच्या उद्देशाने राजा माने यांनी मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्वच विभागातील संपादक-पत्रकारांच्या साथीने डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना स्थापना केली . याच संघटनेच्या पुणे संपर्क कार्यालयाचे नऱ्हे येथे नुकतेच उदघाटन झाले. आता मुंबईत , मस्जिदबंदर पूर्व येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्या म्हणजेच १४ जुलै रोजी उदघाटन करण्यात येणार आहे.
निवृत्त आयपीएस अधिकारी के. एल. प्रसाद यांच्या शुभहस्ते तसेच मुंबई महापालिकेचे सहआयुक्त सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यालयाचे उदघाटन करण्यात येणार आहे. खाजगी सचिव अविनाश सोलवट , नाट्य- सिने दिग्दर्शक विजू माने, बाजीराव मस्तानी फेम अंगद म्हसकर , अभिनेते अभिजित चव्हाण, बार्शी मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोषकाका ठोंबरे तसेच मुंबई शहर पोलिस उपयुक्त शहाजी उमाप यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.
संस्थापक अध्यक्ष डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राजा माने ,उपाध्यक्ष तुळशीदास भोईटे , सचिव नंदकुमार सुतार (पुणे), सहसचिव केतन महामुनी (पुणे) , पुणे शहर अध्यक्ष शामल खैरनार यांसमवेत राज्यातील सर्व जिल्हा अध्यक्ष आणि पदाधिकारी या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत छोट्या आणि अनौपचारिक पद्धतीने हा कार्यक्रम करण्यात येणार आहे.
भारत चेंबर, दुसरा मजला ,रूम क्र. २०७, बरोडा स्ट्रीट व्यापार भवनाच्या बाजूस मस्जिदबंदर पूर्व येथे हे नवे कार्यालय असणार आहे.