राजकीय निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर सोनिया गांधी यांच्या भेटीला; शरद पवार यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबद्दल चर्चा ?
नवी दिल्ली : राजकीय निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी मंगळवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. या बैठकीनंतर अनेक प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. या बैठकीत शरद पवार यांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, या बैठकीत पंजाबमधील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली असल्याची माहिती आता समोर आली आहे.
शरद पवार यांच्या भेटीआधी प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे काँग्रेसच्या भेटीनंतर अनेक तर्क लावले जात होते. प्रशांत किशोर यांनी 11 जून रोजी शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये साडे तीन तास चर्चा झाली होती. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मोट बांधण्यावरुन या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.