मुंबई : पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीष चौधरी यांना आणखी चार दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
यामुळे त्यांना आता १९ जुलै पर्यंत ईडी कोठडीत मुक्काम करावा लागणार आहे. गिरीष चौधरी यांना पाच जुलै रोजी अटक करण्यात आली आहे. ते तेव्हापासून ईडीच्या कोठडीत आहेत.
गिरीष चौधरी यांनी अटक बेकायदेशीर असल्याचे युक्तिवाद चौधरी यांचे वकील मोहन टेकावडे यांनी न्यायालयात केली. तर काही साक्षीदार पुढील आठवड्यात ईडी कार्यलयात येणार आहेत, त्यामुळे साक्षीदार आणि आरोपी यांच आम्हाला समोरासमोर चौकशी करायचे आहे. त्यामुळे सात दिवसांची ईडी कोठडी द्यावी अशी मागणी ईडीचे वकील हितेन वेनेगावकर यांनी न्यायालयात केली. त्यानंतर न्यायालयाने १९ जुलैपर्यंत म्हणजे ४ दिवसांची ईडी कोठडी दिली आहे.