ध्यास विश्वसार्ह बातमीचा

Breaking news.. दहावीचा निकाल जाहीर ; मात्र वेबसाइट हँग

मुंबई : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या ईयत्ता दहावीचा निकाल आज सकाळी जाहीर करण्यात आला आहे. निकाल जाहीर होणार असल्याने पालक आणि विद्यार्थांमध्ये उत्सुकता वाढली आहे. विद्यार्थी आपला दहावीचा निकाल दुपारी १ वाजेपासून विद्यार्थी पाहू शकणार आहेत.

मात्र, निकालाच्या साइटवर ट्रॅफिक वाढल्याने साइट क्रॅश झाली आहे. त्यामुळे निकाल लागूनही तो दिसत नसल्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालकही वैतागले आहेत. लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक एकाच वेळी निकालाच्या दोन्ही लिंक पाहत असल्याने या साइट हँग झाल्या असण्याची शक्यता आहे.

■ विभागनिहाय टक्केवारी

★ कोकण – १०० टक्के
★ पुणे- ९९.९६ टक्के
★ नागपूर – ९९.८४ टक्के
★ औरंगाबाद – ९९.९६ टक्के
★ मुंबई- ९९.९६ टक्के
★ कोल्हापूर -९९.९२ टक्के
★ अमरावती – ९९.९८ टक्के
★ नाशिक – ९९.९६ टक्के
★ लातूर – ९९.९६ टक्के

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!