ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भारतीय पत्रकार दानिश सिद्दिकी यांची अफघाणीस्थानात हत्या

नवी दिल्ली : भारतीय पत्रकार पुलित्झर पुरस्कार विजेते दानिश सिद्दिकी यांची अफघाणीस्थानात हत्या करण्यात आली आहे. दानिश सिद्दीकी हे ४० वर्षांचे होते. दानिश सिद्दिकी हे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्ससाठी काम करत होते. त्यांचा कंदहार येथे वृत्ताकंन करत असताना मृत्यू झाला.

रॉयटर्सचे संपादक अलेस्नद्रा गलोनी यांनी सिद्दीकीच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. तालिबानमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया जगापुढे मांडण्याचं काम सिद्दीकी करत होते हे काम करत असतानाच त्यांची हत्या झाली आहे.

दानिश आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर कंदहारमध्ये चालू असलेल्या हिंसाचाराचे वृत्ताकंन करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. यासंदर्भात त्यांनीच तीन दिवसाअगोदर ट्विटरवर माहिती दिली होती. हल्ल्यातून सुदैवाने मी बचावलो, असे ते म्हणाले होते.

यासंदर्भात माहिती अफगाणिस्तानचे राजदूत फरीद मामुन्दजाई यांनी पत्रकार दानिश सिद्दीकी यांची हत्या झाल्याचे ट्विट करून दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!