माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना धक्का, माजी सभापती प्रशांत पाटील यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
पुणे : भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधु, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
या पक्षप्रवेश कार्यक्रमवेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा अध्यक्ष प्रदीप ग़ारटकर उपस्थित होते. पुणे येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.
आगामी काळात नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. तसेच सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका देखील होणार आहेत. तसेच सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका देखील होणार आहेत. प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून या येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ शकतो असे मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती मा. प्रशांतजी पाटील यांच्यासह संग्रामसिंह पाटील, कुलदीप पाटील, संचित तानाजीराव हांडे आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा @AjitPawarSpeaks दादा यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. pic.twitter.com/q9GKTmtbK1
— Dattatray Bharane (@bharanemamaNCP) July 16, 2021