मुंबई : राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने जोरदार तडाखा लावलेला आहे. राज्यातील अनेक भागात पूर आला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी महाडमधील तळीये गावात जाऊन पाहणी केली. यावरुन भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
“मुख्यमंत्र्यांनी दोन तासाचा का होईना दौरा काढला हे चांगलं केलं”,पण मागील अनुभवाप्रमाणे कोकणवासीयांची बिस्कीट व मेणबत्त्यावर बोळवण करू नका.यावेळी मनापासून मदत करा,आणि खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचेल याचीही काळजी घ्या. या संकटात विरोधीपक्ष म्हणून सोबत आहोत, असं केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी दोन तासाचा का होईना दौरा काढला हे चांगलं केलं, पण मागील अनुभवाप्रमाणे कोकणवासीयांची बिस्कीट व मेणबत्त्यावर बोळवण करू नका. यावेळी मनापासून मदत करा, आणि खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचेल याचीही काळजी घ्या.
या संकटात विरोधीपक्ष म्हणून सोबत आहोत, पण 1/4— Keshav Upadhye (@keshavupadhye) July 24, 2021