ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांकडून चिपळूण शहरातील नुकसानीची पाहणी

चिपळूण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, शिवसेनेचे नेते भास्कर जाधव आणि इतर नेते उपस्थित आहेत.

तीन दिवसापूर्वी कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊन मुख्य बाजारपेठ आणि नागरी वस्तीत सहा ते सात फूट पाणी शिरले होते. आता परिस्थिती निवळली असली तरी, पूरानंतर सावरण्यासाठी नागरिकांना मदतीची गरज आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूण येथे दाखल होताच, चिपळूण बाजारपेठ परिसरात चालत जाऊन व्यावसायिक, दुकानदार यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली तसेच त्यांची विचारपूसही केली.

तुमचं जे नुकसान झालं आहे. त्याची काळजी करू नका. तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आज दिलं.

यावेळी येथील व्यापाऱ्यांनी टाहो फोडली.त्वरित नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी केली. महापुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती देताना अनेकांना अश्रु अनावर झाला होता.काही व्यापाऱ्यांनी आक्रोश व्यक्त केली.

शनिवारी मुख्यमंत्र्यांनी महाडमधील तळई दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर रविवारी मुख्यमंत्री ठाकरे दुपारी बारा वाजताच्या सुमारास चिपळूणमध्ये पोहोचले आहेत. ते येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करून आढावा घेणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!