---Advertisement---

राष्ट्रीय लोकअदालतीचे एक ऑगस्टला आयोजन

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर, दि.27 : राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे होणारी राष्ट्रीय लोकअदालत 1 ऑगस्ट 2021 होणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.आर. देशपांडे यांनी दिली आहे.

एक ऑगस्ट रोजी शहर व जिल्हा, तालुक्यातील सर्व न्यायालयात फौजदारी तडजोडपात्र, बँक वसुली, कलम 138 एनआय ॲक्ट, अपघात न्यायाधिकरण, कामगार वाद, वीज, पाणी देयक, वैवाहिक वाद, भूसंपादन, बँक, सहकारी बँक, पतसंस्था यांच्या वसुलीच्या दरखास्त, बँक लवाद दरखास्त यामधील प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणांवर तडजोडीने वाद मिटविण्यात येणार आहेत. लोकअदालत प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. लोकअदालतीमध्ये येणाऱ्या पक्षकारांनी कोरोनासंदर्भात शासनाने दिलेले निर्देश पाळावेत, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर आणि सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक आहे, असेही श्री. देशपांडे यांनी सांगितले आहे.

जास्तीत जास्त पक्षकारांनी लोकअदालतीचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. देशपांडेल आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव शशिकांत मोकाशी यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!