ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्री बोलतात ‘ते’ आणि प्रत्यक्ष स्थिती यामध्ये खूप मोठे अंतर,देवेंद्र फडणवीस यांची औरंगाबादेत टीका

 

औरंगाबाद, दि.२१ : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज औरंगाबाद दौऱ्यावर होते.त्याठिकाणी त्यांनी येथे पत्रकार परिषदेला संबोधित
केले.ते म्हणाले की…

▶️ तीन दिवसात ९ जिल्ह्यांचा प्रवास केला.शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना जाणून घेतल्या.१०० टक्के नुकसान झाले आहे. जमीन खरडून गेली आहे. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी आहे.

▶️ कापूस, डाळिंब, सोयाबीन अशा सर्व पिकांचे नुकसान झाले.
बियाणे बोगस निघाल्याने तीन पेरण्या झाल्या. पण हाती काहीच येणार नाही, अशी स्थिती आहे.

▶️ ६० टक्के ठिकाणी अजून पंचनामे झाले नाहीत.मुख्यमंत्री म्हणतात ९० टक्के पंचनामे झाले. कदाचित योग्य माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही.

▶️ शेतकऱ्याने मोबाईल फोटो काढला तरी तो ग्राह्य धरला पाहिजे. शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात मदत केली पाहिजे. तोकडी मदत देऊन उपयोग नाही. कर्जमाफी तर पोहोचली नाही, दिवसातून ६ वेळा बँकेचे लोक घरी येऊन तगादा लावत आहेत.

▶️ शेतकरी आक्रोषित आहे.जो काही निर्णय त्यांना घ्यायचा आहे, तो त्यांनी लवकर घ्यावा. मोठ्या प्रमाणात मदत तत्काळ केली पाहिजे.

▶️ केंद्र सरकारकडून जी
काय मदत द्यायची आहे, ती तर मिळणारच.पण राज्याने केवळ हात झटकून मोकळे होऊन चालणार नाही.

▶️ हा राजकारणाचा विषय नाही.
सर्वांनी मिळून शेतकऱ्यांना अधिक मदत कशी मिळेल, हे सुनिश्चित केले पाहिजे.केवळ संभ्रम निर्माण करणे, कुरघोडीचे राजकारण करणे हे थांबले पाहिजे. शेतकऱ्यांना मदत मिळणे याला प्राधान्य हवे.

▶️ ‘एनडीआरएफ‘चे निकष बदलण्याचा राज्य सरकारला अधिकार. त्यामुळे अशा विशेषप्रसंगी मोठी मदत देणे गरजेचे.आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील पुराच्या वेळी तीन पट मदत दिली होती.

▶️ मुख्यमंत्री बोलतात ते आणि प्रत्यक्ष स्थिती यात खूप मोठे अंतर आहे. बियाणे देण्यासाठी लॉटरी पद्धत असा विषय पहिल्यांदाच पाहिला.बियाणे म्हणजे काही म्हाडाचे घर आहे काय ? केंद्र सरकारची मदत कशी मिळते, हे मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी शिकून घेतले पाहिजे,असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!