ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पक्षीय राजकारण बाजूला ठेवून मतदारसंघाचा विकास करणार, वागदरी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे भूमिपूजन

अक्कलकोट  : पक्षीय राजकारण बाजुला ठेवुन वागदरी जि.प मतदार संघाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्न करणार आहे, मात्र जाणुन बुजुन काहीनी विकासाला खीळ घालत असल्यामुळे विकासकामे करण्यास अडचणी येत असल्याचे प्रतिपादन वागदरी जि.प सदस्य आनंद तानवडे यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील जि.प प्राथमिक आरोग्य केंद्रात २ कोटी ८ लाख रूपये खर्चुन बांधण्यात येणाऱ्या वैद्यकिय कर्मचारी व अधिकारी निवासस्थान बांधकामाचे भूमिपुजन तानवडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते मलप्पा निरोळी हे होते.

पुढे बोलताना तानवडे पुढे म्हणाले की, वागदरी जि .प प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी निवासस्थान बांधकाम निधी २ कोटी ८ लाख रूपये परत गेले होते. २०१९ – २० कोरोना व इतर कारणामुळे ३१ मार्च पूर्वी काम पूर्ण होऊ शकले नाही.  नंतर जिल्हा आरोग्य अधिकारी व सीईओ यांच्याकडे सतत पाठपुरावा करून पुन्हा निधी मिळवुन दिला आहे.  या मागील उद्देश असा होता की, जि प मतदार संघाचा विकास व्हावा. त्यामुळे वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी निवास बांधकाम काळाची गरज होती.यात सर्वांचे प्रयत्न कामाला आले. काही लोक वागदरी जि.प. ला एवढे निधी का देता म्हणुन विरोध करतात. त्यामुळे अनेक अडचणी येत असल्याचे तानवडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी विजयकुमार ढोपरे,  सिध्दाराम मठपती,  सरपंच श्रीकांत भैरामडगी,  उपसरपंच लक्ष्मीबाई पोमाजी,विलास सुरवसे, इंदुमती गायकवाड,ग्रा प सदस्या कावेरी नंजुडे,  शारदाबाई रोटे,  मंगाणे,  हनिफ मुल्ला,  शिवानंद घोळसगांव, पंकज सुतार,  श्रीकांत इंडे,  शिवराज पोमाजी,  विकास नंजुडे,  बिराजदार आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!