ध्यास विश्वसार्ह बातमीचा

१७ ऑगस्टला शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती, शाळा सुरू करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर

मुंबई : राज्यात १७ तारखेपासून शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने आदेश काढले होते. टास्क फोर्सने त्या आदेशाला विरोध केला आहे. लहान मुलांसाठी या आजारावर उपयुक्त औषधे नाहीत. शिवाय लहान मुलांना आपण लसीकरण ही सुरू केलेले नाही. त्यामुळे एकदम शाळा उघडल्या तर ते अडचणीचे होईल, अशी भीती टास्क फोर्सने यावेळी वर्तवली आहे.

कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आल्यानंतर निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र तरी लहान मुलांना लस उपलब्ध नसल्याने राज्यातील शाळा सुरू करण्यास संमती देऊ नये, असे मत टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत मांडल्याची माहिती समोर आली अहे. दरम्यान, 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. टास्क फोर्सने याला विरोध दर्शवल्याने तूर्तास शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर पडणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!