सोलापूर (प्रतिनिधी) : जनतेची कामे आणि विकासकामे करताना आपण कोणताही पक्ष, गट पाहत नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून सामान्य जनतेच्या सेवेत आपण कायम कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले. यत्नाळ (ता. दक्षिण सोलापूर) येथे वृक्षारोपण कार्यक्रम, अंतर्गत रस्ते कामाचा शुभारंभ आ. देशमुख यांच्या हस्ते करण्यता आला, त्यावेळी ते बोलत होते.
आ. देशमुख पुढे म्हणाले, भाजप सरकार असताना मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून अनेक गरजू लोकांना मदत केली. मात्र आताचे महाआघाडी सरकार आल्यापासून कोणालाही मदत झाली नाही. आघाडी सरकारकडून भेदभाव केला जात आहे. आपण मात्र विकासकामात कोणताही भेदभाव केला नाही आणि करणारही नाही, असेही ते म्हणाले.यत्नाळ गाव हे महाराष्ट्रात कोणत्या कामासाठी प्रसिध्द होईल, यावरही यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अण्णाराव बाराचारे, तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, ज्येष्ठ नेते हणमंत कुलकर्णी, सरपंच सुनंदा वाघमोडे, उपसरपंच सुनील हिरापुरे, ग्रामपंचायत सदस्य राधाकृष्ण बंडगर, सरुबाई तळीकर, संगीत तळीकर, सोसायटी चेअरमन रमेश तोरणगी, यतीन शहा, अतुल गायकवाड तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.