ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दक्षिण सोलापूर तालुक्यातील 10 गावांचे होणार ड्रोनद्वारे भूमापन, उपअधीक्षक भूमी अभिलेख गिडमणी यांची माहिती

सोलापूर, दि. 18 : गावांच्या जागेतील शेत जमिनी सोडून (महानगरपालिका/नगरपालिका/नगर पंचायत यापूर्वी गावठाण भूमापन झालेल्या गावांचे क्षेत्र वगळून) गावठाणातील जमिनींचे (मिळकतीचे) ड्रोनद्वारे भूमापन (मोजणी) करण्यात येणार आहे. सर्व्हे ऑफ इंडिया, ग्रामविकास विभाग आणि भूमी अभिलेख विभाग यांच्यातर्फे दक्षिण सोलापूर तालुक्यातील 10 गावांच्या गावठाणांचे 23 ऑगस्ट 2021 पासून ड्रोनद्वारे भूमापन होणार असल्याची माहिती उपअधीक्षक भूमी अभिलेख टी.एल. गिडमणी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

ड्रोनद्वारे गावठाणांचे भूमापन हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून याचा ग्रामस्थांना फायदा होणार आहे. सर्वेक्षण करून प्रतिमांचे भूसंदर्भीकरण आणि भूमीकरण करण्यात येणार आहे. यानुसार ड्रोनद्वारे गावठाण मोजणीअंती प्राप्त नकाशाचे अभिलेख अद्ययावत करून उतारे तयार करण्यात येणार आहेत.

सिंदखेड, राजूर, येळेगाव, चंद्रहाळ, बंकलगी, वडजी, नांदणी, बिरनाळ, संजवाड, उळेवाडी या गावात 23 ऑगस्ट 2021 रोजी सर्व्हेक्षण होणार आहे.

सर्व हितसंबंधित ग्रामस्थांनी आपल्या मिळकतीचे स्थळ निश्चित करण्यासाठी पुराव्याच्या कागदपत्रासह प्रत्यक्ष मिळकतीच्या ठिकाणी उपस्थित रहावे. आपल्या अनुपस्थितीमध्ये स्थानिक चौकशी आणि प्रत्यक्ष जागेवरील उपलब्ध माहितीद्वारे कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही श्री. गिडमणी यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!