ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तांत्रिक प्रशालेत प्रवेशासाठी 25 ऑगस्टपर्यंत अर्ज उपलब्ध, 11 वी विज्ञानसाठी प्रवेश

सोलापूर, दि.18: येथील महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला (नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूल) मध्ये चालू शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी इयत्ता 11वी विज्ञान शाखेसाठी (द्विलक्षी) प्रवेश देणे सुरु आहेत. 18 ते 25 ऑगस्ट 2021 या कालावधीत अर्ज विक्री सुरू असल्याची माहिती प्रशालेचे मुख्याध्यापक एम.एस. उडाणशिवे यांनी दिली.

इयत्ता 11वी विज्ञान शाखेसाठी द्विलक्षी अभ्यासक्रम विज्ञानसह तांत्रिक विषय मॅकेनिकल मेंन्टेनन्स व इलेक्ट्रिकल मेंन्टेनन्ससाठी प्रवेश अर्जाची विक्री चालू आहे. संस्थेतून 12 उत्तीर्ण झाल्यावर एमएच-सीईटी/जेईईद्वारे बी.ई. प्रथम वर्षाला प्रवेश घेता येतो. शिवाय डिप्लोमा इंजिनिअरिंग थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेता येतो. या संस्थेतून प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध आहेत. या महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये सुसज्ज प्रयोगशाळा, माफक शैक्षणिक फी, सुसज्ज तांत्रिक प्रयोगशाळा, तज्ञ व अनुभवी अध्यापक आणि भव्य क्रिडांगण व सर्व शासकीय योजनांचा लाभ येथे मिळेल. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन श्री.उडाणशिवे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!