ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वागदरी मतदार संघातील मुस्लिम समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध, शिरवळवाडी येथे मुस्लिम समाजाच्या सभामंडपाचे लोकार्पण

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी जिल्हा परिषद मतदार संघातील मुस्लिम समाजाच्या विकासासाठी भरपूर निधी दिला जात असून यापुढेहीनिधी कमी पडू दिला जाणार नाही,  अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी दिली.

अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी येथे जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांच्या सेस फंडातून मुस्लिम समाज मंदिरसाठी ३ लाख रुपये निधी मंजूर केला होता.  ते काम पूर्ण झाले आहे. मोहरम निमित्त त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला.त्यावेळी ते बोलत होते.पुढे बोलताना तानवडे म्हणाले, मागच्या चार वर्षात मतदार संघाच्या विकासात मोठी भर पडली आहे.  त्यात खास करून मुस्लिम समाजासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे प्रत्येक गावात काहीना काही तरी दिले आहे असे इतरत्र कोठेही झाले नाही यापुढे देखील या समाजाचा विकास करण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करू,असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी शिरवळवाडीचे सरपंच शंकर घोदे , अशोक कोगनूरे,  विश्वनाथ घोदे , हनुमंत घोदे , प्रकाश निंबर्गी , धानय्या स्वामी,  युवराज संगशेट्टी,  दिलीप वडगाव, चंद्रकांत दर्शनाळे, विजयकुमार हळगुणकी,  महेश कोळी,  श्रीकांत हत्तरकी , सिध्दया स्वामी,  संतोष घोदे , वीरभद्र स्वामी,  श्रीमंत पाटील,  रमेश चिडगुपे,  चंद्रकांत होदलूरे,  अकबर कुरणे,  फरिद होटगी , सैपन होटगी,  सलीम होटगी,  उस्मान होटगी,  अहमद शेख,  इब्राहिम फरास, अब्दुल होटगी,  रजाक शेख,  रमजान शेख,  मोसिन शेख, अल्लाउद्दीन कुरणे,  हसन होटगी,  नूरुद्दीन होटगी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!