ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आगामी निवडणुकांसाठी स्वबळाची तयारी ठेवा – डाॅ. बगले 

मंगळवेढा : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका स्थबळावर लढविण्याची तयारी ठेऊन संघटनात्मक कार्य गतिमान करा,असा सल्ला काँग्रेस नेते डाॅ.बसवराज बगले यांनी दिला. जिल्हा आणि तालुका स्तरावरील विविध शासकीय समित्यांवर कॉंग्रेस कार्यकर्ते नियुक्त करण्यासाठी मंगळवेढा येथे सोमवारी दुपारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हा उपाध्यक्ष ॲड.अर्जूनराव पाटील, मंगळवेढा तालुक्याचे निरिक्षक तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डाॅ.बसवराज बगले, जिल्हा सरचिटणीस किशोर पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवेढा तालुका अध्यक्ष ॲड.नंदकुमार पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

भाजपच्या भामटेगिरीला जनता कंटाळली आहे. फसव्या घोषणा केलेल्या लुटारू भाजपला मतपेटीतून महागाईचा झटका बसणारच आहे. अशा वेळी मतभेद बाजूला ठेऊन यापुढे एकदिलाने पक्षवाढीसाठी वेळ दया आणि सर्व समाज घटकांना सोबत घेऊन काम करा, आत्ता फक्त निष्ठावंतानाच संधी मिळेल असेही डाॅ.बगले म्हणाले.

जिल्हा सरचिटणीस किशोर पवार यांनी मंगळवेढा शहर आणि तालुक्यातील काँग्रेसमधील सर्वांनाच आत्ता योग्य संधी मिळेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रचार कार्याचाही आढावा घेण्यात आला.

तालुका अध्यक्ष ॲड.नंदकुमार पवार यांनी तालुक्यातील पक्ष संघटनेची माहिती देऊन कार्याचा अहवाल सादर केला आणि पक्षात सक्रीय असलेल्या सर्वांना न्याय मिळेल अशी हमी दिली. इच्छुकांनी आपली नांवे नोंदविली.ॲड. अर्जूनराव पाटील यांच्या पुढाकाराने महिला नेत्या सुनिता अवघडे यांनी सर्वांना राखी बांधली.

मंगळवेढा शहर आणि तालुक्यातील प्रमुख नेते,मारूती वाकडे,मोहोळचे खरात, दिलीप जाधव, विठ्ठल आसबे, राजाराम सुर्यवंशी, राहूल टाकणे, दतात्रय वरपे, प्रा.दादासाहेब ढेकळे, बापू अवघडे, सूर्यकांत पवार, फारूक मुजावर, तानाजी पाटील, सुशांत नागणे, तुकाराम खांडेकर, महादेव गोडसे, अविनाश नागणे, युवक अध्यक्ष संदीप फडतरे, नाथा ऐवळे, रोहीत लोकरे, वैभव अडसूळ यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी महिला, युवक, विद्यार्थी आणि सर्व सेलचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!