आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, जेऊरच्या मेळाव्यात माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचे आवाहन
जेऊर – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे प्रतिपादन माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी जेऊर येथील काँग्रेस कार्यकर्त्याच्या बैठकीत केले. या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अरूण जाधव, सभापती आनंदराव सोनकांबळे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे, जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जून पाटील, उपसभापती प्रकाश हिप्परगी, विलास गव्हाणे उपस्थित होते.
काँग्रेसची ताकद मोठी असुन कार्यकर्त्यांचे जाळे तालुकाभर पसरले आहे. पंचायत समिती ही ग्रामीण भागाचा कणा आहे. ती ताब्यात असणे गरजेचे आहे. भाजपच्या काळात महागाई व बेरोजगारी वाढली अशा भाजपला मतपेटीतुन ताकद दाखवण्याची हीच संधी आहे असे म्हेत्रे म्हणाले. जेऊरचे ग्रामदैवत श्री काशिलिंगाच्या प्रतिमेचे पूजन म्हेत्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मल्लिकार्जून पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी होते.
विधानसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला असला तरी कार्यकर्त्यांसाठी आमच्या घराचे दरवाजे सदैव खुले राहतील असे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे म्हणाले. यावेळी कूरनूरचे सरपंच व्यंकट मोरे, माजी सभापती महिबुब मूल्ला, मल्लिकार्जून काटगांव, दरगोंडा, दोडमनी आदींची भाषणे झाली.
या प्रसंगी दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, कुमारी शितल म्हेत्रे माजी उपसभापती रामचंद्र आरवत, सिध्दार्थ गायकवाड,माजी उपनगराध्यक्ष गफुर शेरीकर, जीवनज्योती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नागनाथ सुरवसे, नितीन ननवरे, नगरसेवक सद्दाम शेरीकर, विलास सुरवसे, दिलीप काजळे, शिवाजी कलमदाणे, दत्ता डोंगरे, एजाज मुतवल्ली आदी उपस्थित होते.
शंकर म्हेत्रे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध संस्थाच्या वतीने शाल व पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमचे संयोजन तुकाराम दुपारगुडे यांनी केले.