मुंबई : बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. सिद्धार्थचा निधनाचा कारण अध्याप कळु शकला नाही. यामुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. सिद्धार्थने वयाच्या ४० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. सिद्धार्थच्या अकाली निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रेटींनी सिद्धार्थला सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे.
१२ डिसेंबर १९८० रोजी सिद्धार्थचा जन्म झाला होता. बालिका वधू, दिल से दिल तक अशा मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. हम्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. ब्रोकन बट ब्युटिफुल या वेब सीरीजमध्ये काम केलं होतं. त्याने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं होतं.
सिद्धार्थ शुक्ला अभिनेता, मॉडेल आणि होस्ट होता. त्याने एक मॉडेल म्हणून आपल्या करियरला सुरुवात केली होती. २००८ च्या ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या शोमधील मुख्य भूमिकेतून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
बिग बॉस १३ मध्ये शेहनाझ गिल आणि सिद्धार्थची जोडी खूप गाजली होती. यातच डिसेंबर २०२० मध्येच सिद्धार्थ व शहनाज गिलने सीक्रेट मॅरेज केल्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, ही फक्त अफवा असल्याचे सिद्धार्थने स्पष्ट केले होते.