ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मधमाशापालन योजनेच्या लाभासाठी खादी ग्रामोद्योगचे आवाहन

 

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.२ : महाराष्ट्र राज्य खादी
व ग्रामोद्योग मंडळामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मधकेंद्र योजना मधमाशापालन योजनेसाठी आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी ध्रुवकुमार बनसोडे यांनी केले आहे. मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुंतवणूक शासनाच्या हमीभावाने मध खरेदी मधमाशा संरक्षण संवर्धनाची जनजागृती इत्यादी भाग या योजनेची वैशिष्ट्ये आहेत.यासाठी किमान दहावी पास आणि वय एकवीस वर्षांपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.त्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेतजमीन किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली शेतजमीन लाभार्थींकडे मधमाशीपालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता आणि सुविधा असणे गरजेचे आहे. केंद्र चालवण्यासाठी संस्था नोंदणीकृत असावी तसेच एक एकर शेतजमीन स्वमालकीची किंवा भाड्याने घेतलेली असावी, संस्थेकडे मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावेत. यासाठीच्या अटी व शर्ती लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्यासंबंधी मंडळास बंद पत्र लिहून देणे व लाभार्थी स्वगुंतवणूक रक्कम मंडळाकडे भरावी आणि मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. यासाठी इच्छुकांनी खादी ग्राम उद्योग कार्यालयाशी संपर्क करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!