ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन उद्योजकांनी रोजगारनिर्मिती करावी,आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते चार इंडस्ट्रीजचे उद्घाटन

अक्कलकोट  : तालुक्यातील लोकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल आनंद व्यक्त करुन नवीन उद्योग निर्मितीसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उद्योजकानीं रोजगार निर्मिती करावी व अक्कलकोट तालुक्याच्या विकासात सहकार्य करावे ,असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. अक्कलकोट येथे राजकुमार झिंगाडे यांच्या रचित पॉलिमर्स, प्रथम मसुती यांच्या पीएम प्लॅस्टिक व संतोष व आनंद पवार यांच्या यशराज प्लाऊड्स ऍण्ड बोर्ड तसेच अवनीश व्हेंचर्स या उत्पादन इंडस्ट्रीचे उद्घाटन आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

उच्चशिक्षित असूनही नोकरीच्या पाठीमागे न लागता शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन इंडस्ट्रीज सुरुवात केल्याबद्दल कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपनिबंधक कुंदन भोळे, संजय देशमुख , जिल्हा उद्योग केंद्राचे ध्रुवकुमार बनसोडे, सुपरवायझर शेख,खादी ग्रामोद्योगचे विजयकुमार खडके, बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर एम नागराज साहेब व शिवकुमार सोपीमठ,  युनियन बँकेचे मॅनेजर सचिन शिर्के उपस्थित होते.

प्रारंभी पीएम प्लॅस्टिक इंडस्ट्रीचे मालक प्रथम मसुती यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार करून आपल्या प्रास्ताविक मध्ये तरुण होतकरू उद्योजकांना आपल्या अक्कलकोट शहर व तालुक्याच्या विकासासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर योजनेअंतर्गत असलेल्या योजनेबद्दल माहिती देऊन उपस्थित मान्यवरांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर एम नागराज यांनी नवीन उद्योगासाठी कर्जवाटप सबसिडी संदर्भात माहिती दिली. औद्योगिक वसाहतीचे चेअरमन संजय देशमुख यांनी औद्योगिक वसाहतीतील रस्ते,पाणी,२४ तास वीजपुरवठा, स्ट्रिटलाइट व इत्यादी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, नगरसेवक महेश हिंडोळे, मिलन कल्याणशेट्टी, नागराज कुंभार, विक्रम शिंदे, अंबण्णा चौगुले, चंदन अडवितोटे, महाराष्ट्र केमिस्ट ड्रगिस्ट असोशिएशनचे गंगाधर कापसे, दादासाहेब पाटील, मल्लिनाथ साखरे, आप्पासाहेब बिराजदार, राजशेखर हिप्परगी, शिरीष पंडित,  दिनेश पटेल, मुस्लिम समाज अध्यक्ष एजाज मुत्तवल्ली, उधोजक विलास कोरे, महेश कापसे, अशोक येणगुरे, निनाद शहा, सिदाराम मसुती, निरंजन शहा, सचिन किरनळ्ळी, एजाज बळोरगी, बसवराज मसुती,प्रभाकर मजगे, किरण केसूर, डॉ. श्रीकांत पाटील, डाॅ.आर बी पाटील, डॉ. एम के मोरे, डॉ. आसावरी पेडगांवकर, महेश जानकर, दयानंद बमनळ्ळी, राजकुमार बंदीछोडे, राजू कोळी, विकास राठोड, राजशेखर मसुती, अप्पू परमशेट्टी, सागर कल्याणशेट्टी, प्रा.नागनाथ जेऊरे, आप्पासाहेब पाटील,  प्रतिष्ठित व्यापारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नितीन पाटील व सिद्धेश्वर हत्तुरे यांनी केले तर आभार मल्लिकार्जुन मसुती यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!