पुणे : राज्यात सर्वत्र उद्या सकाळी मंगलमय वातावरणात विघनहर्त्या गणरायाचे आगमन होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी यंदाच्या वर्षी देखील गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांना ऑनलाईन दर्शन घेण्याची आवाहन गणेश मंडळांनी केले आहे.
राज्यात कोरोनाचा धोका कायम आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गणपती उत्सवा निमित्ताने पुणे शहरामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करताना 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबरपर्यंत 144 कलम लावण्यात आले आहे.
या संदर्भात पुणे शहर पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी माहिती दिली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून पोलीस आयुक्तालय क्षेत्रात जमावबंदी, प्रार्थना स्थळं बंद ठेवण्यासंबंधी तसेंच संचारास मनाई करणारे आदेश लागू केले आहेत.