ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आगामी काळात दुधनी शहरात पाण्याचा प्रश्न राहणार नाही : म्हेत्रे, विविध प्रभागात जलकुंभाचे भूमिपूजन

गुरुशांत माशाळ

दुधनी, दि.९ : आगामी काळात दुधनी शहरात पाण्याचा प्रश्न राहणार नाही कारण शहराच्या सर्वच भागात पाण्याच्या टाक्या उभे राहत असल्यामुळे दुधनीचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याचे बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी सांगितले. दुधनी नगर परिषद क्षेत्रातील विविध प्रभागात राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ५ हजार लिटर क्षमतेचे ८ फूट रुंद, ८ फूट उंचीच्या सात जलकुंभाना मंजुरी मिळाली आहे.त्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यासाठी १३ लाख ५७ हजार लाख रुपये मंजूर झाले आहेत.यासाठी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे , तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे यांचे सहकार्य लाभले. प्रारंभी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे आणि ज्येष्ठ नगरसेवक सोमण्णा ठक्का यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्या त्या प्रभागातील नगरसेवकांच्या मागणीनुसार आणि शहरातील नागरिकांना उद्भवलेली पाण्याची समस्या लक्षात घेवुन हा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुढील काळात हा प्रश्न निर्माण होवु नये यासाठी जलकुंभांची सोय करण्यात आले आहे, अशी माहिती म्हेत्रे यांनी दिली.

यावेळी नगरसेवक शिवानंद माड्याळ, डॉ. उदय म्हेत्रे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष परमशेट्टी, सिद्धाराम येगदी, गुलाबसाब खैराट, नगरसेविका शबाना मोमीन,नगरसेवक गुरुशांतप्पा परमशेट्टी, चांदसाब हिप्परगी, लक्ष्मीपुत्र हबशी, बसवराज हौदे, गुरुशांत हबशी, महांतेश पाटील, नगरसेविका शबाना मोमीन, श्रीकांत धल्लू, सातलींग भांजी, विश्वनाथ म्हेत्रे, महेश चिंचोळी, शशिकांत सावळसुर, ठेकेदार लोकेश राठोड, संदीप चव्हाण, पुंनु राठोड, भिमु राठोड आदींची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!