ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आर्थिक घोट्याळा केल्याचा आरोप

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी १२७ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे नेते सोमैया यांनी केला आहे.

उद्या 13 सप्टेंबर दुपारी 1 वाजता, ठाकरे सरकारच्या आणखी एका मंत्र्याचा घोटाळा मी उघड करणार, अशी घोषणा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली होती.

 

त्यांनी या संदर्भात आज मुंबईत पत्रकार परिषद घेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबावर १२७ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला.

तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा मनी लाँडरिंग आणि बेनामी व्यवहारांमध्ये सहभाग असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले. मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते. या सर्व घोट्याळ्याची कागदपत्रे मी ईडी आणि आयकर विभागाला दिली असून त्यांनी हसन मुश्रीफ यांचे पत्नी आणि त्यांचे पुत्र नावेद यांची चौकशी करण्याची मागणी किरीट सोमैय्या यांनी केली आहे.

मात्र हे सर्व आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फेटाळून लावला आहे. किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहे, असे स्पष्टीकरण मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. त्यासोबत किरीट सोमय्या यांच्यावर शंभर कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!