नगरपरिषद अधिकारी संघटनेमार्फत सरडे यांच्या कुटुंबीयांना मदत

अक्कलकोट, दि.१३ : अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी नगरपरिषदचे लेखापाल अनिकेत सरडे यांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर परिवारास आर्थिक मदतीचे आवाहन महाराष्ट्र राज्य नगरपरिषद अधिकारी संवर्ग संघटनेमार्फत करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

यासाठी राज्याध्यक्ष संदीप बुरुंगले व घटना समिती अध्यक्ष कैलास चव्हाण यांनी प्रयत्न केले. २१ ते ३० ऑगस्ट दरम्यान ३ लाख ८२ हजार रक्कम जमा झाली होती.त्यापैकी आई-वडिलांना १ लाख ८२ हजार व पत्नीस २ लाख रुपये धनादेशाद्वारे देण्यात आले.

यावेळी संवर्ग संघटनेचे जिल्हा जिल्हाध्यक्ष विशाल चव्हाण, कोषाध्यक्ष समीर नदाफ, धनाजी साळुंके, राजेंद्र गुंड व दुधनी नपचे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment