सोलापूर:- ज्येष्ठ व गुणवंत अभियंत्यांना सन्मानीत करणं हे मोलाचे कार्य आहे असे प्रतिपादन लायन्सचे झोन चेअरमन लायन नंदकुमार कल्याणी यांनी केले. भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती निमित्त अभियंता दिनाचे औचित्य साधून,लायन्स क्लब ऑफ सोलापूरच्या वतीने ” लायन्स अभियंता गौरव पुरस्कार ” प्रदान समारंभात हॅच फ्री मेसाॅनिक हाॅल येथे ते बोलत होते.
लायन्स प्रांतातील उपविभाग एकचे झोन चेअरमन लायन नंदकुमार कल्याणी (बार्शी ) यांच्या अधिकृत भेटी निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी लायन्सचे अध्यक्ष गोविंद मंत्री यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. लायन श्रीकांत सोनी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तर क्लबच्या सेवाकार्याचा अहवाल सचिवा ला. सौ.नंदा लाहोटी यांनी सादर केला. याप्रसंगी प्रगती बिल्डर्सचे जावेद शेख, श्री.चंद्रशेखर कुलकर्णी, बागलकोटी असोसिएटसचे श्री. जितेंद्र बागलकोटी, आर्किड महाविद्यालयाचे अध्यापक श्री. प्रकर्ष संघवे व इंजि. बालमुकुंद सोनी या शहरातील प्रख्यात व नामवंत अभियंत्यांना प्रमुख अतिथी नंदकुमार कल्याणी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. इंजि. प्रकर्ष संगवे व बालमुकुंद राठी यांनी या गौरव पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. गोविंद लाहोटी, संतोष काबरा, अण्णासाहेब कोतली, कल्पेश मालू, मंगल काबरा यांनी सर्व सत्कारमूर्तीचा परिचय करून दिला. यावेळेस क्लबमधील श्रीकांत सोनी, कल्पेश मालू , जयंत होले पाटील, सुनिल पाचकवडे व अभय सुराणा या अभियंत्यांचाही नंदकुमार कल्याणी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सौ. नंदा लाहोटी यांनी आभार मानले तर सौ. अमिता कारंडे यांनी आभार व्यक्त केले.