गुरव समाजातील वसतीगृहाचा प्रश्न आपण मार्गी लावू, आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
अक्कलकोट दि.२३ : अक्कलकोट तालुक्यातील गुरव समाजाचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला वसतीगृहाचा प्रश्न आपण मार्गी लावू, असे आश्वासन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. अक्कलकोट येथील लोखंडे मंगल कार्यालयात आयोजित गुरव समाजातील दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर ह.भ.प.काशिनाथ गुरव महाराज, समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष शिवानंद पाटील, उद्योगपती संजय पाटील, उपाध्यक्ष रमेश फुलारी उपस्थित होते. आमदार कल्याणशेट्टी पुढे म्हणाले, गुरव समाजाने आजवर करीत असलेले सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे.
या समाजाला अनेक वर्षापासून तालुका पातळीवर वसतीगृहाची गरज आहे. समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. हे गुरव समाजाचे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.त्यासाठी समाजबांधवानी जागा उपलब्ध करून द्यावे, मी बांधकाम करून देतो,अशी ग्वाही आमदार कल्याणशेट्टी यांनी दिली.
याप्रसंगी हभप गुरव महाराज, अध्यक्ष फुलारी, यांची समाज प्रबोधनपर भाषणे झाले. कस्तुरी गुरव माता यांनी योगाचे धडे दिले. प्रास्ताविक शरणप्पा फुलारी यांनी केले. सुत्रसंचालन विद्याधर गुरव तर आभार करुणा गुरव यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीसाठी मल्लिनाथ पुजारी, बसवराज फुलारी, स्वामीनाथ गुरव, डॉ.शिवपुत्र गुरव, काशिनाथ बहादुरे, ज्ञानेश्वर गुरव, समन्वय समितीचे काशिनाथ फुलारी, लक्ष्मीपुत्र पाटील, मुत्तण्णा गुरव, प्रदीप गुरव, अशोक अवटे, विजय गुरव, शिवानंद पुजारी, स्वामीराव गुरव, कृष्णा फुलारी, सावित्री गुरव, प्रशांत फुलारी, आदींनी परिश्रम घेतले.