सोलापूर: अंगणवाडीच्या माध्यमातून प्रत्येक घरातील बालकांना योग्य पोषण आहार देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचा हा महत्वकांक्षी कार्यक्रम मंद्रुप येथील अंगणवाडी क्रमांक ५ मध्ये शनिवारी (दि.२५) यशस्वीपणे पार पडला.
सही पोषण, देश रोशन. हर घर पोषण त्योहार हे ब्रीद वा्नय घेवून सोलापूर जिल्हा परिषद तर्फे दक्षिण सोलापूर तालु्क्यातील मंद्रुपच्या माळी गल्ली येथील बहुउद्देशीय सभागृहात महापोषण जत्रा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्या अर्चना घाले उपस्थित होत्या. राणी दयानंद ख्याडे, ऐश्वर्या मायनाळे, रुपाली संजय ख्याडे, प्रियंका कालदे, राधा देशापांडे, गायत्री घाले, अश्विनी म्हेत्रे, सुवर्णा देशमुख , संगीता मुगळे यांची विशेष उपस्थिती होती.
महिला व बालकल्याण अधिकारी जावेद शेख, बालविकास प्रकल्प अधिकारी …
विस्तार अधिकारी ऋषीकेश जाधव, पर्यवेक्षिका रुपाली ढवण यांनी पालकांना ऑनलाइन मार्गदर्शन केले. अंगणवाडीच्या अनिता कामतकर यांनी उपस्थिताना पोषण आहाराचे महत्व सांगितले. यावेळी पालकांनी बीट पासून पौष्टिक लाडू, दुधीभोपळ्याचा हलवा, शेंगा खजूरचे लाडु, शेवगाच्या पाल्याचे पराठे, हादग्याच्या फुलांची भाजी, रानभाज्या स्वतः तयार आणल्या होत्या. त्याचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
गरोदरमाता, स्तनदामाता, किशोरी मुली यांनी योग्य आणि सकस आहार कोणता तसेच कोणते पदार्थ पोष्टीक असतात. सकस आहारामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा याबाबत, सौ. कामतकर यांनी सविस्तरपणे माहिती देवून मार्गदर्शन केले. महिला आणि मुलींनी आपल्या आरोग्याची काळजी घेवून निरोगी राहण्यासाठी सकस आणि पोष्टीक आहार घेतला पाहिजे असे आवाहन ग्रामपंचायत सदस्या सौ. घाले यांनी केले.
अंगणवाडी पाच अंतर्गत असलेल्य महिला आणि किशोरी मुलींनी या कार्यक्रमासाठी मोठ्याप्रमाणात उपस्थिती लावली होती. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून पोषणमाह उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमसाठी मदतनीस मालन शेख, अर्पिता लोभे, केतकी कामतकर, शोभा नंदुरे यांचे विशेष सहकार्य लाभले.