ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुलांना चांगला आहार दिल्यास देश कुपोषणमुक्त बनेल : स्वामी, अक्कलकोटमध्ये राष्ट्रीय पोषण महिना दशसूत्री उपक्रमाचा समारोप

अक्कलकोट, दि.२८ : मुलांना लहानपणीच चांगला आहार दिल्यास देश कुपोषणमुक्त बनेल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केला. सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला जात आहे त्यात सोलापूर जिल्ह्यात पोषण महिना कार्यक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांच्या संकल्पनेतून ‘दशसूत्री’ राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा समारोप अक्कलकोट तालुक्यातील वागदरी आणि शिरवळ गावात करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.

यात पोषण जत्रा कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध प्रकारचे धान्य, रांगोळी प्रदर्शन, आहार प्रात्यक्षिक प्रदर्शन हिरव्या पालेभाज्यांचे महत्व, फळ भाज्यांचे महत्त्व, फळांचे महत्त्व, शाळेची पूर्वतयारी इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी दिलीप स्वामी यांनी आपल्या आहारातून व वेळापत्रकातून कशा प्रकारे आपण तंदुरुस्त राहू शकतो व आपल्या बाळांना कुपोषणमुक्ती पासून कसे वाचवू शकतो याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अक्कलकोट तालुक्यात बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड यांनी हा उपक्रम चांगल्या प्रकारे राबविल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वागदरी व शिरवळ गावातील स्मार्ट अंगणवाडीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, सरपंच बसवराज तानवडे ,सरपंच श्रीकांत भैरमडगी, गटशिक्षणाधिकारी अशोक भांजे, बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड,विस्तार अधिकारी मृणालिनी शिंदे, अंगणवाडी पर्यवेक्षिका शुभदा जेऊरकर, अंजली कुलकर्णी, स्वरांगी गायकवाड, डॉ. पाटील, उपसरपंच लक्ष्मीबाई पोमाजी, सदस्य शिवानंद घोळसगाव, राजकुमार हुग्गे, मल्लापा निरोली, शारदा रोट्टे, कावेरी नांजूनडे, वागदरी , शिरवळ भागातील अंगणवाडी सेविका, मदतनीस , गावातील गरोदर माता, स्तनदा माता, गावातील नागरिक मोठ्या संख्ये उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!