ध्यास विश्वसार्ह बातमीचा

1 ते 7 ऑक्टोबर सिद्धेश्वर वन विहार येथे वन्यजीव सप्ताहाचे आयोजन

सोलापूर,दि.28: वन विभागातर्फे 1 ते 7 ऑक्टोबर 2021 या कालावधीत सिद्धेश्वर वन विहार येथे वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली.

सप्ताहाचे उद्घाटन 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता वन विहार येथे होणार आहे. सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हिरज येथे सोलापूर वन विभाग आणि वाईल्ड कॉन्झर्वेशन असोसिएशन यांच्या वतीने पक्षी निरीक्षण, वन विभाग आणि इको फ्रेंडली क्लब यांच्यातर्फे वन कायदाविषयक साक्षरता अभियान, नान्नज येथे पक्षी निरीक्षण कार्यक्रम होणार आहेत.

वने आणि वन्यजीव यासंदर्भात रांगोळी स्पर्धा 5 ऑक्टोबर रोजी सिद्धेश्वर वन विहार येथे 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत होणार असून दोन बाय दोन आकाराची रांगोळी असावी. लहान गटासाठी 15 वर्षे तर मोठा गट त्यापुढील राहणार आहे. स्पर्धकांनी साहित्य स्वत: आणावे. इच्छुकांनी 5 ऑक्टोबर 2021 सकाळी 10 वाजेपर्यंत लिपीक के.ए. मुलाणी (8237002285) यांच्याकडे नाव नोंदणी करावी.

वन्यजीव सप्ताहाची सांगता 7 ऑक्टोबर 2021 रोजी डॉ. निनाद शहा यांच्या वन्यजीव मार्गदर्शनाने व बक्षीस वितरणाने होणार असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!