---Advertisement---

ग्राम सुरक्षा यंत्रणेवर उद्या अक्कलकोटमध्ये कार्यशाळा

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.11 : अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे व अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यशाळेचे’ बुधवार, 13 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता प्रियदर्शनी सभागृह, अक्कलकोट येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी व दक्षिण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप काळे यांनी संयुक्तरित्या सांगितले.

या कार्यशाळेसाठी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपूते, जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले आहे.

तरी कार्यशाळेकरिता पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी यांनी कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी व दक्षिण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप काळे यांनी केले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!