ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दुधनी व अक्कलकोट तालुक्याच्या विकासासाठी म्हेत्रे परिवार कटिबद्ध, दुधनी येथे विविध विकास कामांचे भुमिपूजन व उदघाटन

गुरुशांत माशाळ,

दुधनी : दुधनीकरांच्या आशिर्वाद व प्रेमामुळे म्हेत्रे घराण्याने १९५७ पासुन ते आजतागायत एक हाती सत्ता मिळविले. असे चित्र कुठेही पहायला मिळत नाही. तालुक्यासाठी व दुधनी शहरासाठी सर्वांच्या सहकार्याने शक्य होईल तेवढे विकास कामे करत आलो आहे. यापुढेही सर्वांच्या प्रेम, बंधुत्वाच्या भावनेने व एकजुटीने विकास कामे करण्यास म्हेत्रे परिवार कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले. ते दुधनी नगर परिषद, दुधनी ग्रामिण आणि सिन्नुर ग्राम पंचयात हद्दीतील विविध विकास कामांच्या भुमिपुजन व उद्घाटन प्रसंगी बोलत होते. तत्पुर्वी दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितिच्या आवरात लोकनेते स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे साहेब यांच्या लोकवर्गणीतुन पुर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असुन त्याचे भुमीपुजन श्री. ष. ब्र. चन्नमल्लेश्वर शिवाचार्य महास्वामीजी तेरीन मठ बडदाळ यांच्या ह्स्ते करण्यात आले.

माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पुढाकारने दुधनी नगर परिषद व सिन्नुर ग्रामपंचायत व दुधनी ग्रामिण भागासाठी मंजुर झालेल्या जवळपास पाच कोटी रुपायांचे विविध विकास कामांचे भुमिपुजन व उदघाटन समारंभ शुक्रवारी विजय दशमिच्या मुहुर्तावर श्री.ष.ब्र. चन्नमल्लेश्वर शिवाचार्य महास्वामीजी तेरीन मठ बडदाळ यांच्या दिव्यसानिध्यात तर माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली अक्कलकोट कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितिचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, जिल्हा परिषद माजी कृषी सभापती मल्लिकर्जुन पाटील, जिल्हा कॉंग्रेस कमिटिचे कार्याध्यक्ष अशपाक बळोर्गी, पंचायत समिति सभापती अॅकड आनंदराव सोनकांबळे, पंचायत समिति सदस्य विलासराव गव्हाणे, कॉंग्रेसचे महिला तालुकध्यक्ष मंगल पाटील, प्रविण शटगार यांच्या प्रमुख उपस्थीतीत पार पड्ला.

पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले कि, आम्ही नेहेमी विकास कामांचे गोष्टी केली आहे. तर विरोधक मात्र विकास कामे न करताच फक्त खोटे बोलतात. खोटे बोलण्याचे संस्कार व संस्कृती आमच्यात नसल्याचे सांगुन, सद्या देशात जाती-पातीचे राजकारण सुरु आहे. याचे अनुभव देशातील गोर-गरीब व सर्व सामान्य नागराकांना येत असल्याचे म्हेत्रे यांनी सांगीतले. यावेळी श्री.ष.ब्र. चन्नमल्लेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी आशिर्वचनपर बोलताना कै. सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे हे त्यांच्या पावलावर पावुल ठेवत कार्य करत असल्याचे सांगीतले. यावेळी मल्लिकर्जुन पाटील, अशपाक बळोर्गी, सुभाष परमशेट्टी आदिनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितिचे संचालक अशोक ढंगापुरे, सातलिंगप्पा परमशेट्टी, मल्लिनाथ कौलगी, शिवराया अरबाळे, अरुण जाधव, सद्दम शेरीकर्, बाबु कोळी, जिल्हा परिषद सदस्य मल्लिनाथ भासगी, डॉ. उदकुमार म्हेत्रे, दुधनी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष गुरुशांत ढंगे, रामचंद्र गद्दी, व्यापरी असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष परमशेट्टी, उपाध्यक्ष राजशेखर दोशी, शिवानंद माड्याळ, चंद्र्कांत येगदी, गुरुशांतप्पा परमशेट्टी, स्वामिनाथ स्थावर मठ, शंकर भांजी, बसवरज हौदे, सोमण्णा ठक्का, सिद्धाराम येगदी, चांदसाब नाकेदार, चंद्र्कांत म्हेत्रे, लक्ष्मीपुत्र हबशी, गुरुशांत उप्पीन, अभियंता आर.टी वडजे, उमरशा मकानदार, संतोष सोळशे, जगदीश माशाळ, प्रशांत लोणी, सुरेश तोळणूर, सातलिंग पादी, मल्लय्या गौर, हाजी नाकेदार, रजाक मुल्ला, विश्वनाथ हडलगी, मोहन देडे, शिवराज स्वामी, सिन्नुर सरपंच कल्पना सोनकांबळे, सिराज पठाण, लिंगराज हौदे, ठेकेदार महेश वानकर यांच्यासह आदी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुशांत गद्दी यांनी केले तर आभार गुरुशांत हबशी यांनी मानले.

चौकट : दुधनी, दुधनी ग्रामिण व सिन्नुर ग्रा.पं या ठिकाणी जवळपास ५ कोटी रुपये मंजुर झालेल्या या विविध विकास कामांचे झाले भुमीपुजन व उदघाट्न

  • सार्वजनिक बांधकांम मंत्री अशोक चव्हाण यांच्या एफडीआरमधुन येगदी मळा ते निंबाळ बॉर्डर पर्यंत रस्त्यासाठी २ कोटी रुपये. (भुमीपुजन)

  • दुधनी रेल्वे स्टेशन ते निंबाळ बॉर्डर पर्यंत जि.प. ५०x५४ अंतर्गत रस्त्यासाठी २० लाख रुपये (भुमीपुजन)

  • दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिति सुशोभिकरणासठी १८ लाख रुपये

  • दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिति अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी १८ लाख रुपये

  • दुधनी नगर परिषद वैशिट्यपुर्ण योजने अंतर्गत मोठी मस्जिद जवळ येथे पेव्हर ब्लॉक व मेन गेट बसविणे २५ लाख, १ ह्जार ३९९, मुतारी बांधकाम करणे ७ लाख ४१ ह्जार ७३३ रुपये, त्याच ठिकाणी पाण्याची टाकी बांधकाम करने २ लाख ३५ ह्जार ५७६ रुपये

  • नुरानी मस्जीद पेव्हर ब्लॉक बसविणे १० लाख ६९ ह्जार ४१२ रुपये, पाण्याची टाकी बांधकाम करणे २ लाख ३५ ह्जार ५७६ रउपये, मुतारी बांधकाम करणे ७ लाख ४१ ह्जार ७३३ रुपये, वॉल कंपाऊंड ९ लाख ६ हजार १० रुपये. असे वैशिट्यपुर्ण योजने अंतर्गत दुधनी न.पासाठी ६४ लाख ३१ हजार ४३९ रुपये कामांचे भुमीपुजन झाले.

  • सिन्नुर ग्राम पंचायतसाठी जिल्हापरिषद अंतर्गत, चौदा व पंधारावा वित्त आयोगतुन जनसुविधा, डिपीसी, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेतुन दलीत वस्ती समाज मंदीर बांधकाम, सिसि रोड, भिम नगर येथे पाणी पुरवठा, सिमेंट बाकडे, दलित स्मशान भुमी संरक्षक भिंत, अंतर्गत बंधिस्त गटार, पेव्हर ब्लॉक, सिन्नुर ग्रा.पं अंतर्गत दुधनी ग्रामिण येथे अंगनवाडी बांधणे, भिम नगर येथे पाणि टाकी बांधणे, अंतर्गत पाईप लाईन करणे, हायमास्ट दिवा, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बांधणे यासह सिन्नुर ग्रा.पं अंतर्गत दुधनी येथील विरशैव लिंगायत स्मशान भुमिला संरक्षक भिंत बांधणे व हायमास्ट दिवे बसविणे. असे जवळ पास सिन्नुर ग्रा.पं व दुधनी ग्रामिण मिळुन १ कोटी ६३ लाख रुपयांचे मंजुर झालेल्या विविध विकास कामांचे भुमिपुजन व उद्घाटन झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!