ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची नियुक्ती

मुबंई, दि. 21 : महाराष्ट्र राज्य  महिला आयोगाच्या अध्यक्षपदी श्रीमती रूपाली निलेश चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  महाराष्ट्र  शासनाच्या राजपत्रात दि. 20 ऑक्टोबर 2021 रोजी याबाबत अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, या दिनांकापासून पुढील तीन वर्षे कालावधी करिता ही नियुक्ती असेल. यापूर्वी विजया रहाटकर या महिला आयोगाचे अध्यक्ष होत्या.

रुपाली चाकणकर यांच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चित्रा वाघ यांनी चाकणकार यांच अभिनंदन केले आहेत.

राज्य सरकारला महिला आयोगाला अध्यक्ष नेमण्यास अखेर मुहूर्त सापडला. असे म्हणत रुपाली चाकणकार यांची नियुक्ती झाली मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते अस ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहेत.

चाकणकर यांचा राजकीय प्रवास नगरसेविका ते प्रदेशाध्यक्ष अस आहे. दौंडमधील शेतकरी कुटुंबात चाकणकर यांचा जन्म झाला. रयत शिक्षण संस्थेतील साधना महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं. पुढे त्यांनी अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास केला. लग्नानंतर सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे रुपाली चाकणकर यांचाही राजकारणात प्रवेश झाला. रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी उत्तमरित्या निभावली आहे. आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची ही मोठी जबाबदारी रुपाली चाकणकर यांच्यावर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!