दिल्ली : देशभरात १०० कोटी लसीचे डोस दिल्याबद्दलचा आनंदोत्सव साजरा केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आज देशवासियांशी संवाद साधला. भारताच्या लसीकरण मोहीमेत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सर्व घटकांचे आभार मानत मोदींनी जनतेला अजुनही लढाई संपलेली नसल्याची आठवण करुन दिली. यावेळी कोरोनाविरोधातील लढाईबाबत मोदींनी देशवासियांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. कोरोनाविरोधात जोपर्यंत युद्ध सुरू आहे, तोपर्यंत मास्कसारखी शस्त्र वापरणे बंद करू नका, असे आवाहन मोदींनी केले आहे.
I request all to celebrate the upcoming festivals with utmost caution: PM @narendramodi pic.twitter.com/U5b5ti7EjD
— All India Radio News (@airnewsalerts) October 22, 2021
लसीकरणावरून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला हे एक प्रकारचे उत्तर आहे. भारत कोरोनापासून सुरक्षित आहे हे आपण जगाला दाखवून दिने आहे. कोणताही भेदभाव न करता लसीकरण करून दाखवणं हे आमचे उद्दिष्ट होते. लसीकरण मोहिमेत व्हीआयपी कल्चरचा हा शिरकाव करू दिला नाही. जे बड्या राष्ट्रांना जमले नाही ते भारताने करून दाखवले. या मोहिमेचे जगभरातून कौतुक केले आहे.
आपल्याला जशी चपला घालूनच घराबाहेर पडण्याची सवय झालेली आहे. तशीच मास्कचीही सवय लावून घ्या. देशातील लसीकरणाने १०० कोटी डोसचा आकडा गाठला आहे. मात्र ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही, त्यांनी मास्कला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. तसेच ज्यांनी कोरोनाविरोधातील लस घेतली आहे, त्यांनी इतरांना प्रोत्साहन दिले पाहिजे. प्रयत्न केल्यास कोरोनाला लवकर पराभूत करू शकू. माझे तुम्हाला आवाहन आहे की, तुम्ही येणारे सण पूर्ण खबरदारी घेऊन साजरे करा, असेही मोदींना आपल्या संबोधनामध्ये सांगितले.
लसीकरण अभियानात व्हीआयपी कल्चरचा शिरकाव होऊ दिला नाही
‘जर कोरोना भेदभाव करत नसेल, तर लसींबद्दल भेदभाव होता कामा नये. भारतीयांनी समोर येत लस घेतली आणि भारतीय लस घेणार की नाही, याला उत्तर दिलं. लसीकरण मोहिमेत कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता विक्रमी लसीकरण केलं. लसीकरण अभियानात व्हीआयपी कल्चरचा शिरकाव होऊ दिला नाही’, असं मोदी म्हणाले.