आम्ही स्वतः पाठपुरावा करून कामे मंजूर करून घेतो : म्हेत्रे, सलगर येथे २ कोटी ३१ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
अक्कलकोट : आम्ही आजपर्यंत दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेतले नाही व उद्घाटनही केले नाही. आम्ही स्वतः पाठपुरावा करून मंजूर करून आणलेल्या कामाचेच भूमिपूजन व उद्घाटन करतो, असे प्रतिआव्हान माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी गुरुवारी दिले. सलगर (ता.अक्कलकोट) येथील २ कोटी ३१ लाख रुपयाचे विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे हे होते.
पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले, माझ्या कारकिर्दीत प्रत्येक गावाला पाच वर्षाच्या काळात दोन ते तीन कोटी रुपयाचे कामे करत होतो. तेव्हा कधी असे उद्घाटनाचा कार्यक्रम केला नाही. जेव्हा त्या गावाला गेलो तरच त्यावेळी त्या कामाचे उद्घाटन करत होतो. मी दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे उद्घाटन करायचे प्रश्नच उद्भवत नाही. आत्ता जाहिरातीचे व सोशल मीडियाचे युग आहे म्हणून जे काम मी शासन दरबारी पाठपुरावा करून मंजूर करून पूर्ण केले आहे, सुरुवात केले आहे त्या कामाचे उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रम हे लोकांना समजावे म्हणून करत आहे, असे म्हेत्रे म्हणाले.
व्यासपीठावर दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, माजी सभापती मल्लिकार्जून पाटील, पंचायत समितीचे सभापती अँड.आनंदराव सोनकांबळे, नगरसेवक अशपाक बळोरगी, नगरसेवक सद्दाम शेरीकर, युवक काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब पाटील, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष मंगल पाटील, पंचायत समिती सदस्य भौरम्मा पुजारी, सरपंच सुरेखा गुंडरगी, पदमसिंह शिवशेट्टी, विनीत पाटील, श्रीशैल बिराजदार, संजयकुमार डोंगराजे, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश हसापुरे म्हणाले, तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सिद्धाराम म्हेत्रे हे आमदार असो किंवा नसो सतत प्रयत्नशील असतात. ते सलगर गावाचा व या संपूर्ण तालुक्याचा विकास केल्याशिवाय राहणार नाहीत. आपणही सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पाठीशी प्रामाणिकपणे उभे रहावे, असे आवाहन केले.
यावेळी संयोजक प्रवीण शटगार म्हणाले की, शटगार परिवारावर शशिकांत शटगार यांच्या निधनाने मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. याकाळात म्हेत्रे परिवार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. म्हेत्रे परिवार आणि शटगार परिवार यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत ते यापुढेही कायम राहतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी शिवानंद बिराजदार, अशोक पाटील, अशोक वरदाळे, इक्बाल बिराजदार, मल्लमा समाणे, राजू लकाबशेट्टी, रामचंद्र जमादार, काशिनाथ कुंभार, यांच्यासह गावातील मान्यवर व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सातलिंगप्पा गुंडरगी यांनी केले तर सुत्रसंचालन सुशील शिंगे यांनी केले तर आभार प्रवीण शटगार यांनी मानले.
सलगर भागासाठी अनेक कामे प्रस्तावित
तालुक्याचा दुष्काळ कायमस्वरूपी मिटावा म्हणून पाठपुरावा करून कुरनूर धरण पुर्ण केले.सलगर भागाचा कायापालट करण्यासाठी मी आपल्या भागातील तलाव वाढवण्यासाठी ८.५० कोटी रुपये कामाचे प्रस्ताव सादर केले आहेत. तेही लवकर मंजूर करून आणणार व या भागाला सुजलाम-सुफलाम करणार आहे – सिद्धाराम म्हेत्रे,माजी आमदार