ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पहिली ते चौथीचे वर्ग लवकरच सुरू होणार..! टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर होणार निर्णय

मुंबई : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पहिली ते चौथीपर्यंतचे सवर्ग सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांनी संमती दर्शविली. गेल्या दोन वर्षांपासून मुले शाळेपासून लांब आहेत त्याचा परिणाम त्यांच्य आयुष्यावर होऊ शकतो. मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने आता शाळा सुरू करावे. अनेक गावांमध्ये शाळा बंद असल्या तरी मुले वर्गात येऊन बसत आहेत. काही शिक्षक त्यांना शिकवत आहेत. त्यामुळे आता तातडीने निर्णय घेऊन शाळा सुरू कराव्यात, अशी विनंती केली आहे.

राज्यातील पाचवी ते बारावी आणि महाविद्यालये सुरू झाल्यानंतर आता पहिली ते चौथीचे वर्ग लवकरच सुरू होणार आहेत. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या सीईओंनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर आता हा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला आहे. टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर शाळेबाबत निर्णय होईल. कदाचित दिवाळीनंतर शाळा सुरू होऊ शकतात असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. पाचवी ते बारावी सुरू झाल्यापासून कोरोनाबाबत योग्य ती काळजी घेतली गेली आहे. पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करतानाही काय काळजी घ्यावी याबाबत अधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहेत. त्यानुसार वेगळ्या मार्गदर्शक सूचना तयार केल्या असून त्या जारी केल्या जातील. याबाबत मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करून निर्णय घेतील. शिक्षण विभागाचे अधिकारी, विविध संस्थाचालकांशीही मी लवकरच चर्चा करणार आहे.’ असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगीतले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!