कोणत्याही परीक्षेसाठी परीक्षार्थी व परीक्षेचे काम पाहणाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, राज्य शासनाचे मध्य व पश्चिम रेल्वे विभागांना पत्र
मुंबई, दि.३० :- सक्षम प्रधीकाराच्या वतीने आयोजित कोणत्याही परीक्षेसाठी परीक्षार्थी तसेच परीक्षा घेण्याच्या कामासाठी प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना लोकल रेल्वेने एका दिवसासाठी प्रवास करण्याची मुभा द्यावी असे पत्र राज्य शासनातर्फे रेल्वे विभागाला देण्यात आले आहे.
कोणत्याही परीक्षेत सेह्भागी होणारे तसेच परीक्षेचा काम पाहण्याची जबाबदारी देण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सार्वत्रिक (युनिवर्सल) पास ऐवजी एका दिवसाच्या प्रवासासाठी तिकीट देण्यात यावे. आवश्यक असल्यास परीक्षा प्रवेश पत्र (हॉल तिकीट), कर्मचाऱ्यांचे ओळख पत्र (आयडी कार्ड) तसेच परीक्षेसाठी व्यक्तिगत किंवा एजन्सीला देण्यात आलेले प्रतिनियुक्ती पत्र याची तपासणी करून तिकीट देण्यात यावे.