संविधान ही माणसं घडविण्याची प्रक्रिया : आ.सुभाष बापू देशमुख, लोकमंगल शिक्षण संकुलात शिक्षण प्रेमींचा सत्कार समारंभ
वडाळा: श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कॉलेज वडाळा यांच्यावतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष बापू देशमुख हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन सामुहिक रित्या या कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्रीकांत दिलीप धारूरकर यांनी केले. सदर कार्यक्रमात सन्माननीय अध्यक्षांच्या हस्ते ज्या कर्मचाऱ्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आपली सेवा बजावत असताना आपली ज्ञान लालसा कायम ठेवून चिकित्सक वृत्ती कायम ठेवून उच्च शिक्षण घेतले अशा पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्यांचा आणि विद्यावाचस्पती (ph.d ) प्राप्त केलेल्या गुरुजनांचा सत्कार संस्थेच्यावतीने करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे श्री अल्ताफ तांबोळी स्टोअर विभागाचे गणेश मुरगुडे गोरोबा कुंभार बब्रुवान कुंभार यांचा पदवी आणि पदविका तसेच श्री अमोल रंगदळ श्री सलमान शेख श्री नंदकुमार स्वामी यांचा तृतीय श्रेणी कर्मचारी मधून पदवी पूर्ण केल्याबद्दल याचबरोबर श्री कृष्णा शेरीकर व श्री सचिन परमशेट्टी यांचा पदवीत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. डॉक्टर किरण जगताप डॉक्टर धनंजय शिंदे डॉक्टर सचिन फुगे यांचा कृषी आणि जैवतंत्रज्ञान विषयातून आणि पशु शास्त्रीय आयुष्यातून विद्यावाचस्पती म्हणजेच पीएचडी अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल गौरव करण्यात आला.
सोलापूर शहर नव्हे तर महाराष्ट्रात ज्यांची साहित्यिक रसिक म्हणून ओळख आहे अशा श्रीमती शोभा बोलली यांचाही सन्मान नाट्य विशारद पदवी पूर्ण केल्याबद्दल संस्थेच्यावतीने करण्यात आला. संस्थेच्या सचिव सौ अनिता ढोबळे यांनी जैवतंत्रज्ञान विषयातून विद्यावाचस्पती म्हणजेच पीएचडी पदवी प्राप्त केली त्याबद्दल संस्थेने त्यांचा विशेष सन्मान केला. या सर्व पुरस्कार प्राप्त कर्मचारी व गुरुजनांनी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना डॉक्टर अनिता ढोबळे यांनी लोकमंगल शिक्षण संकुलने मला कसे घडवले याबद्दल आपले भावनिक मत व्यक्त केले. शोभा बोलली यांनी संस्थे बद्दल कृतज्ञता व्यक्त करताना संस्थेने दिलेला दृष्टिकोन आणि संधी याचे विश्लेषण केले. प्राचार्य डॉक्टर किरण जगताप प्राचार्य डॉक्टर सचिन फुगे डॉक्टर धनंजय शिंदे श्री सचिन परमशेट्टी यांनी संस्थेने दिलेल्या सुविधा आणि केलेली शैक्षणिक मदत याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री सुभाष बापू देशमुख म्हणाले की, लोकमंगल ही माणसे घडविणारी व्यवस्था आहे. लोकमंगल शिक्षण संकुलात संवेदनशील नागरिक घडविण्याची प्रक्रिया होते. देशाची व्यवस्था चालविण्यासाठी संविधान गरजेचे आहे ,संविधानाचा आदर आपण केला पाहिजे आणि संविधानाच्या चौकटीत राहून उत्तम नागरिक बनण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे असे मत श्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर जितेंद्र बाजारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉक्टर अमोल शिंदे यांनी केले. सदर कार्यक्रमास संस्थेतील सर्व प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.