ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लोकमंगलच्या विद्यादान योजनेमुळे शेतकर्‍यांची मुले झाली अधिकारी

सोलापूर : लोकमंगल फाउंडेशनच्या विद्यादान (लोट्स) योजनेमुळे गरीब शेतकर्‍यांच्या मुलांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली असून ही मुले उच्च शिक्षण घेत विविध संस्थांमध्ये उच्चपदावर  पोहचली आहेत. अशा मुलांचा सत्कार नुकताच आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात  आला.

उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा गावतील आकाश आदाटे आणि दिप्ती बहिरजे यांची घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. उच्च शिक्षण घेण्यासाठी भरावी लागणारी फी भरण्याची ऐपत त्यांच्यात नव्हती. अशा स्थितीत त्यांना नाईलाजाने आपले शिक्षण आहे तिथेच थांबवून घरची शेती करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मात्र आ. देशमुख यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या लोकमंगल फाउंडेशनची विद्यादान योजनेची माहिती त्यांना कळली. त्यांनी आ. देशमुख यांची भेट घेतली. लागलीच आ. देशमुख यांनी विद्यादान  योजनेतून त्यांच्या शैक्षणिक खर्चाची तरतूद केली.

आदाटे याची सोलापूरच्या ऍक्सिस बँकेत ऍग्रो रिलेशनशिप ऑफिसर म्हणून निवड झाली तर दिप्ती बहिरजे पुण्याच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये असिस्टंट सिस्टीम इंजिनियर  म्हणून कार्यरत आहे. त्यांचा आ. देशमुख यांनी सत्कार करत पुढील कार्याय शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!